Ad will apear here
Next
पुण्यात झाली ‘गुंतागुंतीच्या लैंगिक प्रवृत्ती’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद
डॉ. क्वॉऊस बायर मार्गदर्शन करताना

पुणे : येथील किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल रिसर्च सेंटर (केईएमएचआरसी) आणि बायर इंडिया यांच्या वतीने ‘ऑनलाइन आवडी-निवडी, ऑफलाइन परिणाम : डिजिटल जगातील गुंतागुंतीच्या लैंगिकतांमधून वाट काढताना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत डॉ. टी. एस. एस. राव, डॉ. मृगेश वैष्णाव, डॉ. हरिश शेट्टी, डॉ. नितीन आनंद, रोहित श्रीवास्तव, एन. एस. नप्पीनाई, सोनाली पाटणकर, डॉ. सुमित नरूला आणि डॉ. बायर यांनी या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन केले.
  
जर्मनीतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसीन’चे संचालक डॉ. क्वॉऊस बायर म्हणाले, ‘वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील लैंगिक हिंसाचारावरील प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचे ‘पीपीपीएसव्ही’चे ध्येय आहे. २००५ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसीन’ने यासाठी एक प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प आता जर्मनीबाहेरील देशांमध्येही राबवण्यात येत आहे. याद्वारे हेबेफिलियाने पीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातात.’  

पुण्यातील केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालक डॉ. लैला गार्डा म्हणाल्या, ‘घटना घडण्यापूर्वीच त्या घटनेला प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी स्वतःमधील पिडोफिलियाच्या प्रवृत्ती ओळखल्या आहेत, ज्यांना कृती करण्यापासून स्वतःला थांबवण्याची इच्छा आहे आणि ज्यांच्या हातून अद्याप गुन्हा घडलेला नाही अशा लोकांवर प्रतिबंधात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून उपचार करण्यात येतील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होईल आणि त्याव्दारे मुलांविरोधातील लैंगिक गुन्हे कमी होतील.’

‘पिडोफिलियाच्या रुग्णांना मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय उपचार देऊन त्यांना गुन्हा करण्यापासून रोखण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे यासाठीचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत,’असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात काढले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZXECF
Similar Posts
२५० महिलांनी घेतला कर्करोग तपासणी शिबिराचा लाभ कोपरगाव : स्तनाचा कर्करोग जागरूकता महिन्यानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्करोग तपासणी आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २५० महिला, मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात आरोग्यरक्षा सेवा अभियान; डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे २७ एप्रिल २०२०पासून पुणे शहरातील वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आरोग्यरक्षा सेवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यात व्यापक तपासणी मोहिमेचा समावेश असून, गरजूंना औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुणे महानगरपालिका,
नेत्रतर्पण उपचार शिबिराचा २०५ जणांना लाभ पुणे : ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण उपचार व नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात एकूण २०५ जणांनी नेत्रतर्पण उपचार घेतले
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language